जिमाका-जळगाव, दि. 2 -
भारतीय वायूसेनेमध्ये ग्रुप “एक्स व ग्रुप “वाय”
ट्रेड करीता एअरमन पदाची भरती आहे. याकरीता उमेदवारांची नोंदणी 12 जानेवारी 2018
पर्यंत ऑनलाईन् www.airmenselection.cdac.in व www.carrerindianairforce.cdac.in या वेबसाईट वर
करण्यात येणार आहे. चाचणी परिक्षा 10 मार्च रोजी होणार आहे.
या
भरती संदर्भातील जाहिरात 2 डिसेंबर, 2017 रोजीच्या एम्प्लायमेंट न्युज/ रोजगार
समाचार मध्ये प्रसिध्द झालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा
घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 022-23714992 वर संपर्क साधावा. असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
००००
No comments:
Post a Comment