Monday, 29 January 2018

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका



         जळगाव दि.29 - येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/डीडी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 5 फेब्रुवारी 2018 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी 2018  रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावा. असे आवाहन जयं पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
           अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनाकर्ष उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनाकर्ष (DD)  तसेच ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरल्यानंतर तीस दिवसांच्या आत वाहन नोंदणी करुन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. तीस दिवसात वाहन नोंदणी न झाल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत वा परतावा होणार नाही. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत  2 फेब्रुवारी 2018 रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी चार वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक राही. असेही श्री. पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment