Thursday, 11 January 2018

उन्नत शेती - समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत यांत्रिकीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन



जळगाव, दि.11 - शासनाने  चालू वर्षी खरीप हंगामापासून राज्यात उन्नत शेती - समृध्द शेतकरी मोहिम राबविण्याचे धोरण स्वीकारले आहे. या मोहिमेंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठया प्रमाणात चालना देण्यात येत असून त्याकरीता शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतक-यांचे अर्ज पुरेशा प्रमाणात प्राप्त झालेले नाहीत. जिल्ह्यांकडे प्राप्त अर्जांना पूर्वसंमती दिल्यानंतरही लाभार्थी औजारे खरेदी करुन अनुदानासाठी प्रस्ताव सादर करत नाहीत असे निदर्शनास येते.
 यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सर्व शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, चालू वर्षी कृषि यंत्रे /औजारे/ उपकरणे यांच्या अनुदानासाठी आपण नजीकच्या मंडल कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अथवा कृषि सहाय्यकामार्फत विहीत नमुन्यातील अर्ज सादर करुन पूर्वसंमती प्रदान केल्यानंतर औजारे खरेदी करुन अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावा. अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल.
 कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना, कृषि औजाराची माहिती, अनुदान मर्यादा तसेच अधिक माहिती उपलब्ध आहे. असे आवाहन सचिन्द्र प्रताप सिंह आयुक्त, कृषि यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment