जळगाव,
दि. 12 - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2014 ते 2017 या कालावधीसाठी
प्राप्त झालेल्या प्रवेशिकांचा प्राथमिक छाननी अहवाल www.mumbaidivsports.com व www.xlroots.com या वेबसाईटवर 14 जानेवारी 2018
रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील
यांनी दिली आहे.
शासन निर्णयातील निकष व तरतुदीनुसार या
प्रवेशिकांचा प्राथमिक छाननी अहवाल पुरस्कारनिहाय 14 ते 20 जानेवारी 2018 या
कालावधीत या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. या अहवालबाबत कोणाला काही
हरकती नोंदवायची असेल तर या विहित नमुना डाऊनलोड करुन त्यामध्ये हरकत नोंदवावी व नोंदवलेली हरकत
पुन्हा त्याच संकेतस्थळावर 20 जानेवारी पूर्वी नोंदवावी. असे श्रीमती सुनंदा
पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment