Monday, 15 January 2018

महिला लोकशाही दिनी तीन तक्रार अर्ज प्राप्त



जिमाका-जळगाव, दि. १५:- दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी महिला लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेण्यात आला. संबंधीत विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिल्या. आजच्या लोकशाही दिनात तीन तक्रार अर्ज प्राप्त झाले असून जिल्हा परिषद, जळगाव, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख व तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना यांचेशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला आहे. हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती रमेश काटकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद, जिल्हा उपनिबंधक, तहसील कार्यालय, पोलीस विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment