Wednesday, 17 January 2018

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर



            जिमाका-जळगाव, दि.17 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
          गुरुवार दि. 18 जानेवारी 2018 रोजी  सकाळी 6 वा. 20 मि. नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 40 मि. नी  अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव.  सकाळी 8 वा. 30 मि. नी  शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने अमळनेरकडे  प्रयाण. सकाळी 9 वा. 30 मि. नी शासकीय विश्रामगृह, अंमळनेर येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. 45 मि. नी  शासकीय वाहनाने कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेरकडे प्रयाण. सकाळी 10 वा. आगमन व बाजार समितीच्या आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण, बाजार आधुनिकीकरण प्रकल्प उदघाटन व गाळे भुमीपुजनास उपस्थिती. (स्थळ :- कृषी उत्पन्न बाजार समिती, धुळे रोड अमळनेर), दुपारी 12 वा. 30 मि.नी. अमळनेर येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 30 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. 45 मि.नी. जळगाव रेल्वे स्थानक येथून गितांजली एक्सप्रेसने कल्याण जि. ठाणेकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment