Tuesday, 16 January 2018

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांची थकबाकी भरुन दोन टक्के व्याज सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन



 जिमाका-जळगाव. दि.१६:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांनी त्यांचेकडील थकबाकी ३१ मार्च २०१८ पूर्वी भरल्यास त्यांना थकीत व्याज रक्कमेवर दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील थकीत लाभार्थ्यांनी त्यांचेकडील थकीत रक्कम भरुन या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या जळगाव जिल्हा कार्यालयामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील थकीत वसुलीबाबत मा. सचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्याचा आढावा घेतला असता थकीत लाभार्थी, त्यांचे जामीनदार हमीपत्र, पगारपत्रधारकाचे वेतनातून कपात, गहाणखत (कर्ज बोजा नोंद उतारे) इत्यादीचे आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसुल कायदा १९६६ मधील तरतुदीनुसार आर.आर.सी इत्यादी अंतर्गत कार्यवाही करुन वसुली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याचे कामकाज चालु झालेले आहे.
जिल्ह्यातील थकीत लाभार्थ्यांनी त्यांचेकडील थकीत रक्कम ३१ मार्च, २०१८ पर्यंत भरल्यास त्यांना थकीत व्याज रक्कमेवर लाभार्थींना २% सवलत देण्यात येणार आहे. याचा लाभ घेवुन सर्व लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरणा करुन कर्ज खाजे बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व कायदेशीर कार्यवाही टाळावी. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment