जिमाका-जळगाव,
दि.21:- महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र
असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या स्टॉल ला राज्याच्या माजी पोलीस महासंचालक मीरां
बोरवणकर यांनी आज भेट दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जानेवारी 2018 मध्ये काढण्यात आलेल्या ‘आपले
पोलीस, आपली अस्मिता’ हा पोलीस विशेषांक भेट देऊन श्रीमती बोरवणकर यांचे स्वागत
केले.
केंद्रीय प्रशासकीय सेवा व महाराष्ट्र
प्रशासकीय सेवेची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युनिक अकॅडमी, जळगाव आणि
विश्वकर्मा पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृह,
जळगाव येथे माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरां चढ्ढा-बोरवणकर यांच्या व्याख्यानाचे व
संवादाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्या
वतीने ‘लोकराज्य’ मासिकाचा स्टॉल लावण्यात आला होता. श्रीमती बोरवाणकर यांनी कार्यक्रमाच्या
सुरुवातीस लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला भेट देऊन लोकराज्य मासिकाचे सर्व अंक
बघितले. तसेच जानेवारी 2018 चा पोलीस विशेषांक बघून त्यांनी या अंकाचे विशेष कौतूक
केले. या विशेषाकांत श्रीमती बोरवणकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘माझ्या
आयुष्याची पानं’ या पुस्तकावर आधारित यशदाचे डॉ. बबन जोगदंड
यांचा प्रेरणादायी ऊर्जा विशेष लेख जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी
दाखविल्याबरोबर त्यांनी हा लेख बघून आश्चर्य व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र शासनाचे
मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाने त्यांच्या ‘माझ्या आयुष्याची पानं’ या
पुस्तकाची दखल घेतल्याबद्दल संपादक मंडळाचे आभारही मानले.
याठिकाणी लावण्यात आलेल्या लोकराज्य
मासिकाच्या स्टॉलला शहरातील मान्यवरांनी भेट दिली. तसेच या स्टॉलला
विद्यार्थ्यांचा प्रंचड प्रतिसाद लाभला.
000
No comments:
Post a Comment