चाळीसगाव, दि. 25 - भारतीय
प्रजासत्ताक दिनाचा 68 वा वर्धापन दिन समारंभ शुक्रवार दिनांक 26 जानेवारी, 2018
रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9 वा. 15
वाजता श्री. शरद पवार, उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांचे हस्ते
पोलीस परेड मैदान, चाळीसगाव येथे होणार आहे.
या कार्यक्रमास नागरीकांनी मोठया
संख्येने उपस्थित रहावे. तसेच एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला स्वत:चा
ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा 10
च्या नंतर करावा. असे कैलास देवरे, तहसीलदार, चाळीसगाव यांनी कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment