जिमाका-जळगाव, दि. १५:-सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणारे शासकीय
वसतीगृहे, निवासी शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तातडीने पूर्ण
करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्यात.
जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त
समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी
कार्यालयात संपन्न झाली. सहायक आयुक्त, समाज कल्याण खुशाल गायकवाड, जिल्हा सरकारी
वकील ॲङ केतन ढाके, सहायक आयुक्त, समाज कल्याण खुशाल गायकवाड, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, सुनिल
अहिरे, कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प, पी. सी. शिरसाठ, प्रकल्प संचालक, जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणा, आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प यावल आदिंसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील
विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या
खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने
प्राप्त करुन घ्यावे. तसेच समाजकल्याण विभागाने नियमानुसार आवश्यक ती सर्व
कार्यवाही तातडीने पूर्ण करुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा
करावी. अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्यात.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी शासकीय
वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप,
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती वाटप, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत
योजना, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती उपयोजनांचा आढावा घेतला.
शासकीय वसतीगृह, निवासी शाळा,
आश्रमशाळेतील 16 हजार 399 विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले आहे. तर
अनिवासी आश्रमशाळेतील 334 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड प्रलंबित आहे. तसेच शासकीय
वसतीगृहातील 548 विद्यार्थ्यांची दुसऱ्या सत्रातील तर 8 आश्रमशाळांची आरोग्य
तपासणी करणे प्रलंबित आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी गोरगावले, ता.
चोपडा येथे बांधकाम करण्याचा प्रस्ताव मंत्रालयास सादर करण्यात आल्याची माहिती
श्री. गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी बैठकीत दिली.
आश्रमशाळेतील ज्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी बाकी
आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ वैद्यकीय
अधिकारी उपलब्ध करुन द्यावेत अशा सुचनाही
जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्यात.
000
No comments:
Post a Comment