जिमाका-जळगाव,
दि. 15:- ग्राहकांची होणारी फसवणुक थांबविण्यासाठी पेट्रोल पंपावर
पारदर्शक नळी बसविण्याची तसेच बीलावर जीएसटी क्रमांक असल्याशिवाय जीएसटीची रक्कम
आकारु नये. अशा विविध सुचना आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अशासकीय
सदस्यांनी केल्यात.
जिल्हा
ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी
राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस शासकीय सदसय् जिल्हा
परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जिल्हा माहिती अधिकारी विलास
बोडके, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एफ.एस. शेख, पोलीस निरिक्षक श्री.
बुधवंत, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मि.
दा. शाहू, व्ही. टी. जाधव, एस. एस. देवरे, वैधमापन शास्त्र विभागाचे सी. डी.
पालीवाल, आरोग्य विभागाचे डॉ. एम. पी.
बावने, दूरसंचार विभागाचे जे. एस. किनगे यांचेसह अशासकीय सदस्य ॲङ मंजुळा मुंदडा, विकास महाजन, विजय मोहरीर,
साहित्यीक अ. फ. भालेराव, बाळकृष्ण वाणी, सतीश
गडे, सौ. उज्वला देशपांडे, सुरेश रोकडे, नरेंद पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी
मागील बैठकीत उपस्थित झालेल्या विविध विषयांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती
जिल्हा पुरवठाव अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव राहूल जाधव यांनी दिली. या बैठकीत
ग्राहकांची फसवणूक होवू नये यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी त्यांचा वस्तु व सेवा कर
क्रमांक दर्शनी भागात लावावा अशी सुचना विजय मोहरीर यांनी केली तर पेट्रोल पंपावर
पेट्रोल व डिझेल भरताना ते ग्राहकांना दिसावे यासाठी तेथील पेट्रोलची नळी पारदर्शक
असावी अशी सुचना ॲङ मंजूळा मुंदडा यांनी केली.
तसेच
सध्या उुसाचा गाळप हंगाम सुरु असल्याने उुसाची बैलगाडी, ट्रक व ट्रॅक्टरने वाहतुक
सुरु आहे. बैलगाडी व ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडलेल्या असतात यामुळे अपघात होण्याची
शक्यता असल्याने याला पायबंद घालण्याची मागणी सतिष गडे यांनी केली. त्याचबरोबर
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम न मिळणे, उघडयावर शौचास बसण्यास पायबंद
घालणे, पॉलीसीचा धनादेश विहित कालावधीत पारीत न करणे, गणवेशाचा निधी
विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणेबाबत, पोस्ट कार्यालयाने अंडर रजिस्टर पोस्ट
(यु.आर.पी) द्वारे पार्सल पाठविण्याची सुविधा रद्द करणे, जे अशासकीय सदस्य तीन
पेक्षा जास्त बैठकांना अनुपस्थित राहतील त्यांना समज देणे आदि विविध सुचना अन्य
सदस्यांनी केल्या. या सुचनांवर संबंधित विभागाला कार्यवाही करण्याच्या सुचना
देण्यात येतील असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी सांगितले.
000
No comments:
Post a Comment