जळगाव. दि. 17 - राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या
‘लोकराज्य’ मासिकाच्या जानेवारी 2018 चा पोलीस विशेषांक प्रकाशित झाला. या
विशेषाकांचे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी भरभरुन कौतुक केले आहे. या विशेषाकांने प्रभावित
होऊन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व
पोलीस ठाणी लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार केले आहे.
माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचा पोलीस विशेषांक प्रकाशित केला
आहे. हा अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशील ‘आपले पोलीस, आपली अस्मिता’ यावर आधारित आहे. या विशेषांकाचे पत्रकार
दिनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे
यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात विमोचन करण्यात आले. ‘लोकराज्य’ चा पोलिस
विशेषांक पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. विशेषाकांतील
माहिती पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानात भर घालणारी आहे. या माहितीमुळे
पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमतेने काम करण्यास मदत होणार
आहे. तसेच हा अंक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत अनेक
मान्यवरांनी व्यक्त केले.
जिल्ह्याचे
जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी लोकराज्य मासिकाच्या यापूर्वीच्या
अंकाचेही कौतूक केले आहे. लोकराज्य मासिकामुळे शासन राबवित असलेल्या विविध विकास
योजनांविषयीची अधिकृत माहिती मिळण्यास मदत होते. लोकराज्य चा जानेवारी महिन्याचा
अंक पोलीस विशेषांक असल्याने या अंकाने अधिकच प्रभावित झाल्याने जिल्ह्यातील सर्व
बासष्ट पोलीस ठाणी लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार करण्याचा निर्णय घेतल्याचे
श्री. कराळे यांनी सांगितले. त्याचबरोबर या पोलीस ठाण्यांना लोकराज्य मासिकाचे
वार्षिक वर्गणीदार करण्यासाठी वार्षिक वर्गणीचा धनादेश जिल्हा माहिती अधिकारी
विलास बोडके यांचेकडे त्यांनी खासदूतामार्फत पाठविला.
०००
No comments:
Post a Comment