Thursday, 25 January 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

            जळगाव, दि. 25 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा शुक्रवार, शनिवार, रविवार दि. 26 ते 28 जानेवारी, 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
         शुक्रवार दि. 26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वा सोईनुसार परभणी येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. 
             शनिवार दि. 27 रोजी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 वा. 30 मि.नी. जळगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा. महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. सकाळी 11 वा. 30 मि.नी. ते दुपारी 2 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 2 ते 3 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3 ते सायं 7 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
          रविवार दि. 28 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 वा. जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 वा. 30 मि.नी. जळगाव येथे ग. स. सोसायटी सदस्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा 30 मि.नी. ते दुपारी 2 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 2 ते 3 वा. पाळधी, ता. धरणगाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3 ते सायं 7 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
                                                                  ०००

No comments:

Post a Comment