Tuesday, 16 January 2018

सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री ना. सुभाष देशमुख यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



        जिमाका-जळगाव. दि. 16:- राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख हे गुरुवार दिनांक 18 जानेवारी, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
       गुरुवार दि. 18 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 6 वा. 13 मि.नी. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण.  सकाळी 6 वा. 30 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 7 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून अमळनेरकडे प्रयाण. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ स्थळ :- कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर. दुपारी 12 ते 1 वा. 30 मि.नी. जळगाव जिल्हा- सहकार व पणन विभाग आढावा बैठक. स्थळ - कृषी उत्पन्न बाजार समिती, अंमळनेर. दुपारी 1 वा. 30 मि. नी ते 2 वा. 15 मि. पर्यंत राखीव. दुपारी 2 वा. 15 मि.नी अंमळनेर येथून धुळेकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment