Wednesday, 24 January 2018

अल्पसंख्याक बहुल शाळा, महाविद्यालय व संस्थांना अनुदान प्रस्ताव सादर करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ



           जळगाव, दि. 24 - सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान मिळणेसाठी 18 सप्टेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यास शासनाने मुदतवाढ दिली असून अशा संस्थांना आपले अनुदान मागणी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यासाठी 31 जानेवारी, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समिती,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
        जिल्ह्यातील इच्छुक धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा व संस्थांनी आपले अनुदान मागणी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 31 जानेवारी, 2018 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन श्री. निंबाळकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment