Friday, 19 January 2018

हातमाग विणकरांनी बुनकर मित्र हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन



         जिमाका-जळगाव, दि. 19:- हातमाग विणकरांचे हित जोपासण्यासाठी व त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांची सर्वंकष माहिती देण्यासाठी ‘बुनकर मित्र’ या नावाने हेल्प लाईन क्र. 18002089988 सुरु केली आहे. ही सेवा मोफत देण्यात येत असून यासाठी विणकराला कोणतीही फी आकारली जाणार नाही.
            राज्यात हातमाग विणकराने विणलेला माल थेट ग्राहकांपर्यत पोहचून जास्तीत जास्त नफा प्रत्यक्ष विणकरास मिळण्यासाठी केंद्र शासनाने www.indiahandmadebazaar.com  या नावाने स्वतंत्र पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलव्दारे हातमाग विणकरांना त्यांचे उत्पादनाचा तपशील, उत्पादनाचा फोटो इत्यादी माहिती अपलोड करुन नवनवीन बाजारपेठ काबिज करता येणार आहे.
            राज्यातील सर्व हातमाग विणकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादे‍शिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई  यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) 400601, Email-rddtertiles३mumbai@rediffmail.com दुरध्वनी क्रमांक - 022-25405363 वर संपर्क साधावा.
०००

No comments:

Post a Comment