Thursday, 25 January 2018

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. अर्जुन खोतकर यांचा जिल्हा दौरा

            जळगाव, दि. २५ - राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग
राज्यमंत्री ना. अर्जुन खोतकर हे  गुरुवार २५ व शुक्रवार २६ जानेवारी, २०१८ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा  जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
          गुरुवार २५ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २.०० वाजता जालना येथून मोटारीने जळगावकडे रवाना. सांयकाळी  ५.०० वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन, राखीव व मुक्काम.
            शुक्रवार २६ जानेवारी, २०१८ रोजी सकाळी ९ वा. ५ मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून पोलिस कवायत मैदानाकडे प्रस्थान. सकाळी ९ वा. १३ मि.नी. पोलिस कवायत मैदान येथे आगमन व स्वागत. सकाळी ९ वा. १५ मि.नी. ध्वजारोहण व राष्ट्रगीत, सकाळी ९ वा. १७ मि. नी. ते ११ वा. १० मि.नी. पर्यंत मान्यवरांचे शुभेच्छापर भाषण, परेडचे निरीक्षण, सत्कार व प्रमाणपत्र वितरण, संचलन, स्वातंत्र्य सैनिक व नागरीक यांना शुभेच्छा भेट, सांस्कृतिक कार्यक्रम व चहापान. सकाळी  ११ वा. १५ मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे रवाना व राखीव. सोईनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून मोटारीने दर्शना बंगला, जालनाकडे रवाना.  
                                                                        000

No comments:

Post a Comment