Wednesday, 17 January 2018

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा



        जिमाका- जळगाव,दि.17:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
            गुरुवार 18 जानेवारी रोजी सकाळी 6.45 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.00 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने अमळनेरकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर समितीद्वारा निर्मित व्यापारी संकुल व गोडाऊन तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणा म्हणून व उपस्थिती. (स्थळ :- कृषी उत्पन्न बाजार समिती धुळेरोड, अमळनेर), सोईनुसार अमळनेर येथून शासकीय वाहनाने जामनेर जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर जि.जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री जामनेर जि.जळगाव येथे मुक्काम.
00000

No comments:

Post a Comment