जळगाव, दि.23- जिल्ह्यातील डाक विभागातील सर्व 42 पोस्ट कार्यालय मध्ये सी एस आय प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे. जळगाव विभागात या अगोदर सी. बी. एस. प्रणाली लागू झाली असून त्यात सर्व प्रकारच्या खात्यांची माहिती समाविष्ट झाली आहे. त्यानंतर आर. आय. सी. टी. प्रणाली मुळे सर्व लहान गावातील पोस्ट ऑफिसचे व्यवहार संगणकीकृत झाले. त्यामुळे औरंगाबाद विभागात वरील तीनही सेवा राबविणारा जळगाव डाक विभाग हा पहिला विभाग ठरला असल्याची माहिती अधिक्षक डाक्घर, जळगाव यांनी दिली. आहे.
या प्रणालीचे उदघाटन खासदार ए. टी. नाना पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी सर्व पोस्टातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी डाक अधीक्षक श्री. चव्हाण, सहाय्यक डाक अधीक्षक श्री. मालकर, श्री. गायकवाड, श्री. गणोरे, श्री. एम. एन. पाटील, पोस्टमास्तर जळगाव रमेश पवार, संतोष जलंकार व सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.
या प्रणालीमुळे सर्व कर्मचारी यांची सेवा पुस्तके, रजा यांची माहिती यावर आली आहे. तसेच पोस्ट कार्यालयातील सर्व प्रकारच्या सेवा या प्रणाली मध्ये समाविष्ट आहे. यामुळे डाक विभागाची सर्व कामे पेपरलेस होणार असून कामात गतिमानता येण्याबरोबरच सर्व सेवांमध्ये पारदर्शकता येणार आहे. सर्व माहिती पोस्टल ऑडीट, नागपूर या संस्थेला जोडली जाणार आहे. त्यामुळे या विभागाशी होणारा पत्रव्यवहार करण्यासाठी जाणारा वेळ वाचून सर्व प्रकारच्या कागदपत्रांची बचत होवून पोस्टाचा स्टेशनरीवर होणारा खर्च वाचणार आहे. त्याचबरोबर या सेवेमुळे कामात गतिमानता येवून ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा तत्पर मिळतील. अशा विश्वास डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांनी व्यक्त केला आहे.
०००

No comments:
Post a Comment