Sunday, 14 January 2018

वृध्दांच्या जीवनात तिळगुळ देवून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्माण केला गोडवा



       जळगाव दि. 14 :- मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज सायंकाळी सावखेडा शिवारात जावून मातोश्री वृध्दाश्रमातील प्रत्येक वृध्दाच्या खोलीमध्ये जावून तिळगुळ देवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तेथील वृध्दांच्या भावना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. काहींच्या डोळयात अश्रू दिसत होते. यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी तेथील सर्व व्यवस्थाची पाहणी करत आरोग्य सेवा, भोजन व्यवस्था याबाबत जाणून घेवून काही अडचण असल्यास संपर्क साधावा अशी सुचना दिली. यानंतर त्यांनी लगत असलेल्या आभाळ माझ घर या संस्थेतील मतीमंद मुलांना तिळगुळ देवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. तेथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तेथे दाखल करण्यात आलेल्या मुलांच्या पालकांविषयी माहिती घेतली.
दिपस्तंभाच्या मनोबल कक्षास भेट
            जळगाव शहरात दीपस्त्ंभ संचलीत मनोबल केंद्रास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भेट देवून केंद्रातील विद्यार्थ्यांना तिळगुळ देवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
000

No comments:

Post a Comment