जिमाका-जळगाव, दि.१७:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६८ वा वर्धापन
दिनाचा मुख्य शासकीय समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर २६ जानेवारी २०१८ रोजी
सकाळी ८.३० वाजता होणार आहे. यावेळी होणाऱ्या संचलनात राज्य शासनामार्फत
राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान, बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान,
मुद्रा बँक योजना, सामाजिक वनीकरण, आरोग्य सेवा या विभागांच्या विविध शासकीय
योजनांवर आधारित चित्ररथ सामील करण्यात येणार आहे. तसेच शहरातील शालेय विद्यार्थी
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी दिली.
या
समारंभाची पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री.
निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस अपर पोलीस अधिक्षक बच्चन
सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसूल) अभिजीत भांडे
पाटील, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा माहिती
अधिकारी विलास बोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, जिल्हा महिला व
बालविकास अधिकारी रमेश काटकर, तहसीलदार अमोल निकम, महापालिकेचे श्री. दाभाडे,
समाजकल्याण विभागाचे श्री. पाटील, सहायक पोलीस उप निरिक्षक आर. एस. पवार यांचेसह
विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी
उपस्थित होते.
प्रजासत्ताक
दिनाचा समारंभ नीटनेटका होण्यासाठी संबंधित विभागांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी
सर्व विभागांनी व्यवस्थितपणे पार पाडण्याची सुचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केली.
महात्मा गांधी उद्यानात देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
भारतीय
प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील महात्मा गांधी उद्यान येथे
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांयकाळी ५ ते ७ या वेळेत पोलीस
दलाच्या बॅण्ड पथकाद्वारे सुरेल देशभक्तीपर गीतांचे वादन करण्यात येणार आहे. हा
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याने कार्यक्रमास शहरातील नागरीकांनी मोठ्या
संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले
आहे.
00000
No comments:
Post a Comment