जळगाव, दि. 29 - सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांचेकडून
सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ कामकाज करण्याऱ्या संस्थांना सहकार पुरस्काराने
गौरविण्यात येते. त्यानुसार सन 2016-17 साठीचे सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव 31
जानेवारी, 2018 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.
संबंधित संस्थांनी आपले प्रस्ताव सादर
करणेसाठी व अधिक माहितीसाठी त्यांचे मुख्यालय ज्या तालुक्यात आहे. त्या तालुका
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयास संपर्क करावा. असे आवाहन श्री. जाधवर
यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment