Tuesday, 23 January 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

     जळगाव, दि. 23 - आठव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांचेवतीने गुरुवार 25 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमास नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. 
       जनतेमध्ये मतदार नोंदणी व मतदान याबाबत जनजागृती करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सन 2011 पासुन दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. त्यानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
                                                                   ०००

No comments:

Post a Comment