जिमाका-जळगाव.
दि.१६:- अमळनेर
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्घाटन, गाळे भूमिपूजन,
आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण, नगराध्यक्ष व सरपंच यांचा सत्कार समारंभ, ई-नाम
योजनेचा शुभारंभ व वेबसाईटचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते गुरुवार १८ जानेवारी
२०१८ रोजी सकाळी
१० वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे होणार आहे. अशी माहिती कृषि
उत्पन्न बाजार समितीचे सभापती उदय वाघ यांनी दिली आहे.
या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान राज्याचे
महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.
चंद्रकांत दादा पाटील हे भूषविणार असून बाजार आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्घाटन
राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांच्या हस्ते तर
गाळ्यांचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन
यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे
म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. उज्वलाताई पाटील, खासदार ए. टी. नाना
पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सौ. स्मिताताई वाघ, आमदार चंदूलाल
पटेल, माजीमंत्री व आमदार एकनाथ खडसे, आमदार सर्वश्री. संजय सावकारे, हरिभाऊ
जावळे, शिरीष चौधरी, उन्मेश पाटील, सुरेश भोळे, माजी केंद्रीय मंत्री एम. के.
अण्णा पाटील, विजय नवल पाटील, पणन विभागाचे संचालक संजय पवार, जिल्हा परिषदेचे
उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, आरोग्य सभापती दिलीप
पाटील, महिला व बाल कल्याण सभापती रजनी चव्हाण, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे,
अमळनेर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती वजाबाई भिल, उपसभापती श्रीमती त्रिवेणीबाई
पाटील, अमळनेरच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपनराध्यक्ष विजय लांबोळे, माजी
आमदार सर्वश्री. कृषिभूषण साहेबराव पाटील, अमृतराव पाटील, गुलाबराव पाटील, डॉ. बी.
एस. पाटील, हिरा उद्योग समुहाचे चेअरमन रविंद्र हिरालाल चौधरी, खान्देश शिक्षण
मंडळाचे अध्यक्ष महेश देशमुख, अमळनेर अर्बन बॅकेचे चेअरमन भरतकुमार ललवाणी हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांना नागरीकांनी मोठया
संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन उपसभापती अनिल पाटील यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment