जळगाव, दि. 25 यावर्षीच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात 5 फेब्रुवारी, 2018 रोजी प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. खेळाडू उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्रांची संबधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी करुन त्याबाबतचा अहवाल 5 फेब्रुवारी पुर्वी प्राप्त करुन घ्यावा. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने 1 जुलै, 2016 च्या शासन निर्णयान्वये सर्व समावेशक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. या शासन निर्णयातील नियम 4, (पाच) नुसार खेळाडू उमेदवाराने अर्ज करण्यापुर्वीच सुधारित तरतुदी नुसार विभागीय उपसंचालक यांचेकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडू उमेदवाराने अर्जसोबत विभागीय उपसंचालक यांनी क्रीडा प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत खेळाडू कोणत्या संवर्गासाठी पात्र ठरतो. याबाबत प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. याप्रमाणे पडताळणी केलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडलेली नसल्यास शासन निर्णयातील नियम 6 (आठ) (नऊ) नुसार उमेदवाराचा खेळाडू संवर्गातून विचार केला जाणार नाही.
जिल्ह्यातील खेळाडू उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्रांची संबधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी तात्काळ करुन घ्यावी. पडताळणी केल्याबाबतचे विहित कालावधीतील प्रमाणपत्र अर्जासोबत नसल्यास अर्जदारांचा खेळाडू संवर्गातून विचार करण्यात येणार नसल्याचेही श्री. कराळे यांनी कळविले आहे.
000

No comments:
Post a Comment