Wednesday, 31 January 2018

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्यावतीने यावल येथे महामेळावा संपन्न



            जळगाव, दि. 31 - जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जळगांव आणि तालुका विधि सेवा समिती, यावल, चोपडा, रावेर यांच्यावतीने शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ याबाबत यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
            या महामेळाव्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश कु. सविता टी. बारणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आर. बी. हिवाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव चे सचिव श्री. के. एच. ठोंबरे यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी, वकील संघाचे तालुका पदाधिकारी व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधींनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
            या शिबीरात महसुल विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, पशु वैद्यकीय विभाग, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण आदि विभागांनी सहभाग घेवून विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसार करुन काही नागरीकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभ मिळवून दिला.
            या शिबीरामध्ये विविध विभागांचे एकूण 25 स्टॉल लावण्यात आले होते. या शिबीरास आदिवासी बहुल तालुक्यातील अंदाजे चार हजार नागरीक उपस्थित होते. या नागरीकांनी शासनाच्या विविध योजनांमध्ये आपल्या नावाची नोंदणी केली. शिबीराच्या यशस्वीतेकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव चे सचिव श्री. के. एच. ठोंबरे यांनी परिश्रम घेतले. या  शिबीरासाठी मुख्यत्वे करुन विविध शासकीय विभाग, त्यांचे अधिकारी, वकील संघ व अशासकीय संस्थांचे सहकार्य लाभले.
000

No comments:

Post a Comment