जिमाका-जळगांव, दि. १८:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी सकाळी
साडेआठ वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेआठ वाजता धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 2.00 वाजता जळगावकडे प्रयाण. दुपारी 2 वा 30 मि.नी सहकार भारती व
जळगाव जनता सहकारी बॅक लि. जळगाव यांच्या आयोजित राष्ट्रीयस्तर परीषद समारोप
कार्यक्रमास उपस्थिती. सायं 5.00 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
रात्री 8 वाजता सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
००००
No comments:
Post a Comment